Thane Kopari Builder cheats Residents: कोपरीतील सिंधी कॉलनीतील इमारतधारकांना आधी ४५० चौरस फुटांचे घर विकासकाने मंजुर केले होते. परंतु, त्यानंतर आता ते देणे शक्य नसल्याचा मुद्दा त्यांने उपस्थित केला आहे. याला विरोध केल्याने विकासकाने महापालिका अधिकाऱ्यांना आणि इमारतीमधील काहींना हाताशी धरुन इमारतच अतिधोकादायक घोषित करून रहिवाशांना बेघर करण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप ठाणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.