Kalyan – Dombivali Illegal Building: कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांवर बेकायदा बांधकाम प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण मधील मांडा-टिटवाळा प्रभागातील बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयशी ठरल्याने साहाय्यक आयुक्त संदीप रोकडेंना निलंबित करण्यात आले आहे.
एकीकडे डोंबिवली मधील 65 इमारतीचा प्रश्न ऐरणीवर असताना पालिकेच्या आदेशांची अंमलबजावणी न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.