केरळच्या तिरुअनंतपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका २३ वर्षीय तरुणाने त्याची आजी, भाऊ आणि प्रेयसीसह एकूण पाच जणांची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. सोमवारी सायंकाळी काही तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी या हत्याकांडाच्या घटना घडल्या. नेमकं प्रकरण काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊ.