महाशिवरात्रीनिमित्त बारावं ज्योतिर्लिंग असेलेल्या घृष्णेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. यावेळी व्हीआयपी रांगेतून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सहकुटुंब जात असताना सार्वजनिक रांगेत उभे असलेले भाविक बॅरीगेट्स ओलांडून दानवेंच्या मागे गेले. त्यामुळे एकच गोंधळ झाला. हे पाहून दानवे देखील माघारी परतले आणि बाहेर येऊन काहीकाळ थांबले होते. या सगळ्या प्रकारावर दानवे यांनी नंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.