पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोत धक्कादायक घटना घडली आहे. डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याटी घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजबद्दल पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली. त्याचबरोर या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळातूनदेखील संताप व्यक्त केला जात आहे. याबद्दलचे सर्व अपडेट्स जाणून घेऊ.