Superstitions cruel act: चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील 22 दिवसाच्या बाळाला गावातील भोंदूबाबा (भूमका) ने गरम विळा तापवून 65 वेळा चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अतिदुर्ग मेळघाटा अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे 22 दिवसीय बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावावरून हातरू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले होते. मात्र, बाळाची गंभीर प्रकृती पाहता येथून या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहे.