Jalgaon Influencer Killed by Father: धरणगाव-एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकारचा उलगडा झाल्याचं कळतंय. प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील याच्या वडिलांनी स्वतःला संपवण्याआधी आपल्या २२ वर्षीय लेकाचा खून केल्याची कबुली या सुसाईड नोटमध्ये दिली होती.