पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका२६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. प्रकरणातील आरोपील न्यायालयाने १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान आरोपीच्या वकीलांनी मध्यमांसमोर बोलताना न्यायालयात नेमका काय युक्तीवाद झाला याबद्दल माहिती दिली. तसंच आरोपी गाडे याच्या भावाला देखील पोलिसांनी सोबत ठेवल्याची माहिती देताना वकीलांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.