शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोलीत शुक्रवारी ठाकरे गटाचे उपनगराध्यक्ष आणि आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. कोकणाने ठाकरेंना पूर्णपणे हद्दपार केलं आहे. तसंच भविष्यात महाराष्ट्र देखील करेल असं रामदास कदम म्हणाले.