पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं राज्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे हे संवेदनशील प्रकरण तर दुसरीकडे राजकीय नेत्यांची असंवेदनशील विधानं. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. त्यानंतर संजय सावकारे यांनी आता माफ त्यांच्या विधानाबाबत माफी मागितली आहे.