पिंपरी-चिंचवड मध्ये एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत घाडगेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटने प्रकरणी शेखर भरत जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी प्रशांत घाडगेने त्याची चार चाकी गाडी पिंपरीतील नामांकित सर्विस सेंटरला दुरुस्तीसाठी टाकली होती. परंतु, प्रशांतला गाडीतील पेट्रोल आणि बिलामध्ये फेरफार झाल्याचा संशय आला. यावरून त्याचा मॅनेजर शेखर भरत जाधव यांच्यासोबत शाब्दिक वाद झाले. यानंतर प्रशांत ने त्याच्या मित्रांना बोलवून मॅनेजर शेखर जाधव याच्यासोबत वाद घातले. वादाच रूपांतर मारहाणीत झालं. शेखर जाधवला प्रशांत घाडगे ने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पिंपरी पोलिसांनी याबाबत तात्काळ तक्रार घेतली. घटने प्रकरणी शेखर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास के.एस.बी चौक चिंचवड या ठिकाणी घडली आहे. घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.