संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. याबाबत बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील या टोळीला राजकीय वरदहस्त असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी हा राजकीय वरदहस्त दिला आहे त्याला परिणाम भोगावे लागतील. तसंच आरोपींना मदत करणाऱ्यांना, फरार आरोपींना अटक झाली पाहिजे, असंही बजरंग सोनवणे म्हणाले.