छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य घराघरात पोहोचवण्यासाठी ‘छावा’ चित्रपटाला माहिती देणारे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यानेच फोनवरून धमकी दिल्याचा उलगडा झाला आहे. मात्र चार दिवस उलटूनही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या न लागल्याने सावंत यांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे.