पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कालवा समितीची बैठक विधानभवन पार पडली. या बैठकीला अजित पवार, उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर या तिघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. तर अजित पवार यांची गाडी विधान भवन परिसरात आल्यावर अजित पवार यांनी त्यांच्या चालकाला खाली उतरवले. त्यानंतर अजित पवार, उमेश पाटील आणि उत्तमराव जानकर या तिघांमध्ये जवळपास १५ मिनिटं चर्चा झाली.