मी शरद पवार गटाचा आमदार आहे. आमचे १० लोकं आहेत. एका आमदाराने काही फरक पडत नाही, गेलो तर राजीनामा देऊन जावं लागेल, असं शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्याबरोबर एकाच गाडीतून प्रवास केल्यानंतर त्यांच्याबरोबर १५ मिनिटं चर्चा झाली होती. त्यामुळे अनेक राजकीय चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आता स्वतः जानकर यांनीच स्पष्टीकरण दिलं.