‘सामना’च्या रोखठोक सरदारामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात पहाटे चार वाजता झालेल्या एका कथित संवादाबद्दलचा दावा करण्यात आला आहे. याबद्दल खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी हा संवाद खरा आहे असं म्हटलं आहे.