महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषीका ही यात्रेत गेली होती, यादरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले, याबाबत शंका येताच सुरक्षारक्षकाने त्याच्या हातातील मोबाईल घेतला परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावे केली. या आधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलं म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला.