बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने १८०० पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंचा निकवर्तीय वाल्मिक कराड या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे असाही उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. असं असतानाच करुणा धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सूचक पोस्ट केली आहे.