मुक्ताईनगर शहरालगत असणाऱ्या कोथळी या गावी आदिशक्ती मुक्ताईची यात्रा भरते. या यात्रेदरम्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींची काहींनी छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्या टवाळखोरांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. मात्र त्यांच्यावर कारवाई होईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी दिली आहे.