रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबरोबर असला प्रकार घडत असेल, तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलांना न्याय कसा मिळणार, असा संतप्त सवाल रोहिणी खडसे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.