मुक्ताईनगरमधील यात्रेत घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. हे टवाळखोर नसून तर ते गुंड आहेत, त्यांच्या विरोधात आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या चार-पाच वर्षात गुंडगिरी वाढली. त्यामुळे महिला असुरक्षित असल्याचंही ते म्हणाले.