केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या काही मैत्रिणींची मुक्ताईनगर येथील मुक्ताई यात्रेत काही टवाळखोरांनी छेड काढल्याचं प्रकरण समोर आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांचीच लेक सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या मुलींच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.