Ajit Pawar : आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे. या आधी रविवारी संध्याकाळी जी पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांमधली टोलेबाजी चर्चेत राहिली. कारण अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर अजित पवार यांनीही त्यांना मिश्कील उत्तर दिलं. या संभाषणाची चर्चा रंगली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये कुठलंही शीतयुद्ध नाही असं म्हटलं आहे.