Devendra Fadnavis : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जातो. यावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. तसेच अन्य एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे दोषी आढळून आल्याने त्यांचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूया..