Pune Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका२६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अशातच पोलिसांनी आता या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केली आहे.दत्तात्रय गाडेचा भाऊ राहुल गाडे याने नुकतीच एक पत्रकार परिष घेतली आहे. “या घटनेची सखोल चौकशी व्हावी”, असं राहुल गाडे पत्रकार परिषदेत म्हणाला.