Pune Swargate Rape Case Update: पुणे शहरातील स्वारगेट आगारात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला त्याच्या मूळ गावी गुणाट येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी गावात वेगळाच वाद सुरु झाला आहे. पोलिसांनी जाहीर केलेली एक लाख रुपयांची बक्षीसाची रक्कम आता गावकऱ्यांमध्ये वादाचं कारण ठरत असल्याने सरपंचांनी एक मोठा निर्णय जाहीर केलाय. नेमका हा प्रकार काय हे पाहूया.