Suresh Dhas : बीडमधल्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला अमानुषपणे आणि क्रूरपणे करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला होता. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या झाली. मागच्या अधिवेशनात त्यांनी सगळं क्रौर्य सांगितलं होतं. आता संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोनंतर सुरेश धस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.