Pune Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणात पीडितेच्या वकिलांकडून न्यायालयाकडे अर्ज करण्यात आलेला आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर चाप बसवण्याची मागणी सरकारी वकील असीम सरोदे यांनी केली आहे. यावेळी आरोपीच्या वकिलांनी केलेल्या विधानावरून सुद्धा सरोदे यांनी कानउघाडणी करत प्रत्येक फील्डमध्ये असे असंवेदनशील लोकं असतात त्यांना संवेदनशील करण्यासाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम सातत्याने घेतले पाहिजेत, असं म्हटलंय.