Dhananjay Munde Resigns, Suresh Dhas First Reaction: बीडमधल्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला अमानुषपणे आणि क्रूरपणे करण्यात आली.अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या झाली. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला होता. मागच्या अधिवेशनात त्यांनी सगळं क्रौर्य सांगितलं होतं. आता संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली आहे. या एकूण प्रकरणावर आता धस यांनी काय प्रतिक्रिया दिलीये हे पाहूया.