Dhananjay Munde First Post After Resignation : धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) सकाळी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.” मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.