गेले पाच आठवडे भारतीय भांडवली बाजारात पडझड सुरू आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना परताव्याची अपेक्षा ठेवणे अगदी साहजिक असते. मात्र सध्या इथली सरकारी धोरणे गुंतवणूकस्नेही राहिलेली नाही. परताव्यावर लावण्यात आलेला कॅपिटल गेन टॅक्स हे त्यामागच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. गुंतवणूकदारांना आश्वस्त वातावरण हवे असते, तसे ते राहिलेले नाही, त्यामुळेच विदेशी गुंतवणूकदारांनी इथून काढता पाय घेत चीन आणि अमेरिकेमध्ये गुंतवणूक करणे पसंत केले आहे. गेल्या पाच आठवड्यांत घसरणीवर असलेल्या शेअर बाजाराचे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण