Dhananjay Munde Resignation: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे व हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आंदोलन पेटलं आहे. संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्तेचा निषेधार्थ अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाज यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच उद्या दिनांक पाच रोजी कर्ज शहर कडकडीत बंद ठेवण्याची देखील जाहीर करण्यात आले. तसे निवेदन महसूल व पोलीस प्रशासनाला देण्यात आले व फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशी मागणी करण्यात आली आहे.