Supriya Sule Protest In Pune: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटून गेले आहेत.तर याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं असून दोषारोप पत्रातून अनेक खुलासे करण्यात आले आहेत.त्याच दरम्यान संतोष देशमुख यांना कशा प्रकारे मारहाण करीत मारण्यात आले.याबाबतचे फोटो समोर आले आहेत.हे फोटो पाहून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना फाशीची देण्यात यावी,ही मागणी केली जात आहे.त्या सर्व घडामोडी दरम्यान धनंजय मुंडे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्याच दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात संतोष देशमुख यांना शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मेणबत्ती पेटवून श्रध्दांजली वाहिली आणि यावेळी मूक आंदोलन केले.