छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे माजी राज्यापाल कोश्यारी ते प्रशांत कोरटकर यांच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी विरोधकांच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी देखील सहभागी झाली होते. प्रशांत कोरटकर असेल, सोलापूरकर असेलक किंवा अबू आझमी असतील या तिघांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे मागणी विरोधकही करत असतील तर त्याला आपलं समर्थन आहे, असं मिटकरी यावेळी म्हणाले.