Jaykumar Gore Reaction : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आला आहे. शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हा आरोप केला. या महिलेला जयकुमार गोरे यांनी अश्लिल फोटो पाठवल्याचा दावा राऊतांनी केला असून याप्रकरणी सभागृहात आवाज उठवणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. दरम्यान, आरोप प्रत्यारोप होत असताना आता जयकुमार गोरे यांनी आज विधानभवनात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे.