राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेवरून केलेल्या विधानाचे पडसाद आज विधापरिषदेत उमटल्याचं पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत भैय्याजी जोशी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, कामकाज पत्रिकेत हा विषय नसल्याने अनिल परब यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला त्यावरून सभागृहात गदारोळ झाला.