राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेवरून केलेल्या विधानावरून विरोधी पक्षानेतील नेत्यांनी आक्रमत पवित्रा घेत सरकारने यावर भूमिका मांडवी अशी मागणी केली. याविषयी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे, असं म्हणत भूमिका स्पष्ट केली.