Kailas Borade Burned By Iron rod In Jalna: अन्वा येथील कैलास बोराडे यांना चटके दिल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, यातील आणखी एक आरोपी आणि उबाठा गटाचा भोकरदन तालुकाध्यक्ष नवनाथ दौंड अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेतायत. दरम्यान, या दौंडला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चमन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शनी मंदिर, नूतन वसाहत अंबड चौफुली मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दरम्यान, दौडला तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा ईशारा यावेळी मोर्चेकरांनी दिलाय.