शहर असो किंवा ग्रामिण भाग महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा कायमच ऐरणीवर राहिला आहे. त्यामुळेच महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची स्थापना केली गेली. याच पथकातील एक सोनाली हिंगे हिने १२ वर्षांपूर्वी पोलीस प्रशासनातील आपला प्रवास सुरू केला. सध्या ती पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दामिनी पथकात कार्यरत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेली सोनाली हिने पीएसआय होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण केवळ अर्ध्या मार्काने तिची ही संधी हुकली. पीएसआय होता आलं नाही, पण पोलीस प्रशासनातच रुजू होणार हा तिचा ठाम निर्धार होता. आज जागतिक महिला दिनानिमित्त तिच्याशी साधलेला हा खास संवाद.