Pankaja Munde Exclusive Interview Loksatta Loksamvad: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, दोन समाजांमध्ये निर्माण झालेली तेढ, एका समाजाला करण्यात येणारे लक्ष्य यामुळे आपण अस्वस्थ असून बीडमधील या साऱ्या घटना म्हणजे नैतिकतेची हत्या असल्याचे परखड मत ज्येष्ठ भाजप नेत्या आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी नोंदविले. सोमवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर मनमोकळे भाष्य केले.