Sanjay Raut: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल १९ वा वर्धापन दिन होता.चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात हा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील विविध नेत्यांनी भाषणं केली.तसंच,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी कुंभमेळ्याबाबत भाष्य केलं. राज ठाकरेंनी कुंभमेळ्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.