अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीपूर्वी महायुतीने जी आश्वासनं दिलेली त्याची या अर्थसंकल्पात घोषणा झालेली दिसत नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार)ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात असमतोल तयार झालेला आहे असंही ते म्हणाले.