अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अर्थ नसलेला संकल्प आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या जाहिरातीचा कागदच दाखवला. ‘मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी’ असा टोलाही त्यांना लगावला.