अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पाकडे बघितल्यावर भविष्यापेक्षा इतिहासाचा जास्त वेध घेतला आहे, उद्योगाविषयी बोलायचं की इतिहासाबद्दल अधिक बोलायचं हा जो तारतम्यचा भाव असतो त्याचा अभाव या अर्थसंकल्पात असल्याची प्रतिक्रिया लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दिली आहे.