Women Body Chopped Up Found In Suitcase In Pen: रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने, खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. साधारणपणे तीस ते चाळीस वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सुटकेस मध्ये आढळून आला. त्यामुळे पेण परिसरात खळबळ उडाली.पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.