Gaurav Ahuja Man who Peed In Midroad at Pune: पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात बीएमडब्लू गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली.त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर त्या तरुणाने अश्लील हावभाव करून भरधाव कारने निघून गेला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता याप्रकरणी गौरव अहुजाच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर येत आहे.