Latur Man Beaten On Road: मंगळवारी सायंकाळी शहरातील अंबाजोगाई रस्त्यावर एका तरुणाला पाच-सहा जणांनी बेदम मारहाण केली व ते दुचाकी वर बसून पळून गेले. शंभर -दीडशे लोक झाला प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते मात्र कोणीही त्यांना अडवले नाही. पोलिसांनी अवघ्या चार तासात त्यापैकी चार आरोपीच्या मुसक्या आवळल्या व रस्त्यावरून त्यांची वरात काढत त्यांना पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे याच मारहाणीची क्लिप शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा पोलिसांना आवाहन करत पोस्ट केली आहे.