Black magic articles found in Lilavati Hospital : लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लिलावती रुग्णालयात गेल्या २० वर्षांत १२५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी ट्रस्टने १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातील माहिती लिलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली. लिलावती रुग्णालयात काळी जादू केली जात असल्याचं ते म्हणाले.