Ladki Bahin Yojana Aditi Tatkare vs Varun Sardesai: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. आजच्या दिवशी लाडकी बहीण योजनेवरून ठाकरेंच्या गटाचे आमदार वरूण सरदेसाई आणि महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्यात प्रश्नोत्तरे झाली. वरुण सरदेसाई यांनी किती महिलांना अपात्र ठरवल्याबाबत विचारले असता त्यावर तटकरेंनी आकडेवारी मांडली शिवाय २१०० रुपयांच्या निर्णयाबाबत सुद्धा तटकरेंनी विधान केले आहे.