भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. यासंदर्भातल माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.